करोना आणि जिद्द
करोना आणि जिद्द लेखन : जगदीश बोरसे. मागे माझ्या माहितीतल्या एका व्यक्तीला साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला पण वैद्यकीय तपासाअंती असं लक्षात आलं की त्याला चावलेला साप हा विषारीच नव्हता फक्त साप चावला या भीतीने त्याचा मृत्यू झाला. मित्रहो सध्या करोना च सुद्धा तसंच काहीतरी सुरू आहे. मला करोना झाला या भीतीनेच माणूस खचून जातो. पण त्याला जिद्दीने तोंड दिलं तर बाहेरही पडता येतं अशी ही बरीच उदाहरणं समोर आहेत. माझे शालक सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र ऐंशी व त्यांच्या सौ. दोघेही करोना पॉझिटिव्ह आले होते घरातली लहान मुलं गावाकडे पाठवून दोघांनीही करोना ला जिद्दीने तोंड दिले. मधे काही दिवस ऑक्सिजनची पातळी खूप खाली गेल्यामुळे त्यांची भीती खूप वाढली होती अगदी त्यांच्याकडून जर अनुभव ऐकले तर डोळ्यांत पाणी येण्यासारखी अनुभव आहेत. दोन लहान मुले डोळ्यासमोर दिसत असताना हे दोघी करोना सोबत झुंजत होते. घरातली कर्ती बाईच करोना पॉझिटिव्ह असल्याने घरातला स्वयंपाक तसेच इतर देखरेख त्यात अनेक द...